दैनिक स्थैर्य | दि. ६ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
सातारा येथील शाहू स्टेडियम येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, सातारा’ यांच्या वतीने आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये फलटण येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पूनम जनार्दन पिसाळ व डॉ. कदम या दोघींनी महिला दुहेरी विजेतेपदावर आपली मोहोर उठवली. डॉ. पूनम यांनी डॉ. कदम यांच्या साथीने एकही सेट न गमावता सलग ५ मॅचेस जिंकून ही कामगिरी केली. तसेच ५ फेब्रुवारी रोजी फलटण येथे ‘फलटण डॉक्टर्स असोसिएशन’ द्वारा आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारातही त्या विजेत्या ठरल्या आहेत.
डॉ. पूनम या एम. डी. डॉक्टर (हृदयरोगतज्ज्ञ, मधुमेहतज्ज्ञ) म्हणून फलटण तालुक्यामध्ये ओळखल्या जातात. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पुणे येथे डिसेंबरमध्ये झालेल्या डॉक्टर्स ऑलिम्पिकमध्येही डॉ. पूनम यांनी सहभाग नोंदविला होता.