
दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२३ । मुंबई । कार्डिफ युनिव्हर्सिटीने कार्डिफ युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल स्टडी सेंटर येथील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना सर्वोत्तम अर्थ्यांपन, पाठिंबा व अध्ययन अनुभव देण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण विशेषज्ञ स्टडी ग्रुपसोबतच्या त्यांच्या सहयोगाचे नूतनीकरण केले आहे. बहुतांश विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे पदवी शिक्षण घेण्यासाठी शहरामध्ये राहत आहेत.
या उपक्रमाचा भाग म्हणून आशा आहे की, कार्डिफ युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल स्टडी सेंटर २०२७ पर्यंत दरवर्षाला ८०० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी वाढवेल. नवीन अर्थ्यांपन क्षेत्रे, विद्यार्थी सुविधा व पाठिंबा देखील वाढवण्यात येतील, ज्यामुळे जगभरातील प्रतिभावान तरूणांचे वेल्श राजधानीकडे लक्ष वेधून जाईल.
स्टडी ग्रुपसोबतच्या तीन यशस्वी वर्षांच्या सहयोगाला अधिक पुढे नेण्यात आले आहे. या सहयोगांतर्गत स्टडी ग्रुप आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना रिक्रूटमेंट, प्रवेश, अर्थ्यांपन आणि कार्डिफ युनिव्हर्सिटी येथील शिक्षणासाठी तयारी करण्यामध्ये साह्य करण्याच्या माध्यमातून कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय सहभागात्मक धोरणामध्ये अधिक योगदान देईल.
स्टडी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी इयान क्रिक्टन म्हणाले, “आम्हाला विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित संस्थेमधील शिक्षणाच्या माध्यमातून लाभ देण्याकरिता या संधी निर्माण करण्यासाठी कार्डिफ युनिव्हर्सिटीसोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय शिक्षण इतके महत्त्वाचे कधीच नव्हते. हवामान बदल व दारिद्र्यता अशा मोठ्या जागतिक आव्हानांचा सामना करायचे असो, वाढत्या भूराजकीय विभागण्यांमधून नेव्हिगेट करायचे असो किंवा शाश्वत आर्थिक विकासाला चालना द्यायची असो भविष्यात जागतिक कौशल्ये असलेल्या व्यक्तींची आणि राष्ट्रीय सीमांपलीकडे जाणाऱ्या दृष्टिकोनांची गरज आहे. आम्ही जगभरातील वाढत्या विद्यार्थी समूहाला युनिव्हर्सिटीमधील व्यापक पदवी कोर्सेसमध्ये यशस्वी होण्यास साह्य करण्यासाठी उत्सुक आहोत, ज्यामुळे त्यांना आपल्या सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यास मदत होऊ शकते.”