
स्थैर्य, सातारा, दि. २३: पुणे-बेंगलोर महामार्गावर नागेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत कार व दुचाकीच्या अपघतात एकजण ठार झाला. राहूल गुलाब कांबळे वय 38 रा. सोनगिरवाडी, ता. वाई असे मृताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, नागेवाडी गावच्या हद्दीत पोलीस चौकीसमोर स्वीफ्ट कार (एमएच 12 एफएफ 4541) आणि दुचाकीची (एमएच 11 व्ही 1053) समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार राहूल कांबळे हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.