
![]() |
बनगरवाडी येथील शिवारातील पोलीसांनी जप्त केलेली गांजाची झाडे |
स्थैर्य, म्हसवड दि. ५ : सातारा एल सी बी व म्हसवड पोलिस स्टेशनच्या संयुक्त कारवाईने वरकुटे मलवडी नजीक असलेल्या बनगरवाडी येथे एका शेतात अवैधरित्या लावण्यात आलेली गांजाची झाडे पोलीसांनी सापळा रचुन ताब्यात घेत संबधीत शेतकरी व अन्य एकजण ताब्यात घेतले आहे. या कारवाईतील अधिकारी व कर्मचारी यांचे जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते ,अप्पर पोलिस अधिक्षक धिरज पाटिल यांनी अभिनंदन केले तर या कारवाईत ७ लाख ८१ हजार रुपयांची गांजाची झाडे पोलीसांनी जप्त केली आहेत.
या बाबत म्हसवड पोलीस स्टेशनकडुन मिळालेली माहिती या प्रमाणे बनगरवाडी ती.माण येथील शिंगाडे नामक शिवारात गांजा या अंमली पदार्थाच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सातपुते यांना मिळाल्या नंतर माण खटावचे उपविभागीय अधिकारी बाबुराव महामुनी यांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व म्हसवड पोलिस स्टेशनचे सपोनि गणेश वाघमोडे व तहसीलदार बाई माने यांच्या पथकाने समक्ष तेथे जावून माहिती घेण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे ते पथक बनगरवाडी येथील शिंगाडे यांच्या मळ्याच्या शिवारात सापळा लावला त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या शिवारातील गांजाच्या झाडाची पाने तीन इसम तोडत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते म्हणाले हि झाड़े विकण्यासाठी लावली असल्याची माहिती दिली नंतर त्यांच्या ताब्यातील ७ लाख ८१ हजार ७५० रुपये किमतीचा अवैध रित्या शेतात लावलेला गांजा जप्त करुन तिघांना ताब्यात घेऊन त्यांचे वर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधिक्षक सातपुते मॅडम, अप्पर पोलिस अधिक्षक पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत पोलिस उपविभागीय अधिकारी महामुनी, दहिवडी पोलिस अधिकारी सर्जेराव पाटिल, स्थानिक गुन्हे अन्वेशनचे पोलिस निरिक्षक आनंदसिंग साबळे, सपोनि गणेश वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक प्रसंन्न जर्हाड, पृथ्वीराज घोरपड़े,उत्तम बदडे,पो ह तानाजी माने,विजय कांबळे मुबीन मुलाणी, संतोष पवार, पो ना अर्जुन शिरतोडे, रवि वाघमारे,अजित कर्णे, संजय जाधव, पंकज बेचके, सहाय्यक पोलिस निरीक्षक ए व्ही कोळी पो काॅ खटावकर , संतोष माळी, कुंभार, पिंजारी म्हसवड ठाण्याचे काळे, रवि काकडे, वाघमोडे आदीजण सहभागी होते.