पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांनाच उमेदवारी – आ. मकरंद पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२१ । लोणंद । आमदार मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणंद राष्ट्रवादीचा काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा लोणंद येथील अमृता मंगल कार्यालयात संपन्न झाला.

मेळाव्यात बोलताना आबानी माझ्या सोबत गाडीत बसणारे किंवा सतत पुढे पुढे येत जवळीक दाखवणारांनी आपली उमेदवारी गृहीत धरू नये. उमेदवारी त्यांनाच मिळणार जे पक्षाचे खरे कार्यकर्ते आहेत. ज्यांना जनाधार आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून ज्यांनी काम केलंय अशांनाच उमेदवारी देण्यात येईल असे सांगत दिखावा करणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांचा समाचार घेतला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, खंडाळा कारखान्याचे सर्व उमेदवार चांगल्या प्रकारे निवडून दिले . लोणंदचे अनेक प्रश्न आपणाला मार्गी लावायचे आहेत लोणंदला जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा विकास झाला नाही याची मनात खंत आहे. भाषणबाजी करुन पोपटपंची करुन १७ जागा येणार नाहीत. कार्यकर्ता हा जागरुक असला पाहिजे. कोणतीही निवडणुक कार्यकर्त्यांच्या बळावरच जिंकली जाते. आरक्षणानुसार कोण सक्षम आणि निष्ठावंत उमेदवार असेल त्याला उमेदवारी  दिली जाईल.  ज्याला लोकमान्यता नसेल त्याला उमेदवारी दिली जाणार नाही. तळागाळात काम करणारा उमेदवार पाहिजे. विरोधकांना कधीही कमजोर समजायचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस एक विचाराने व जिद्दीने या निवडणुकीला सामोर जाणार आहे. कार्यकर्त्यांनी लोकांच्यात जाऊन काम केले पाहिजे. पक्षाशी प्रामाणिक राहणे कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. लोकांचे प्रश्न जी व्यक्ती सातत्याने सोडवत असेल अशा लोकांना लोक उचलून धरत असतात असे सांगत उमेदवारी देताना या सर्व बाबी विचारात घेणार असल्याचे सांगीतले.

डॉ. नितिन सावंत यांनी आपल्या मनोगतात बोलताना आबांनी कोरोना काळात आपल्या मतदारसंघात खुप मोठे कार्य केले, त्यांच्या  मार्गदर्शनाखाली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून काम करायचे आहे. राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता नगरपंचायतीवर आणण्यासाठी दिवस रात्र काम करायचे आहे. आबा जे उमेदवार देतील त्या उमेदवारांसाठी आपणाला काम करायचे आहे. येणाऱ्या निवडुकीत १७ चे १७ उमेदवार निवडून आणायचे आहेत असे आवाहन केले.
यावेळी निवडणुक ही आगळी वेगळी होणार असून प्रत्येक प्रभागातुन मिटींग घेऊन त्या प्रभागात कोण उमेद्वार असावा त्याप्रमाणे उमेदवार दयावा आमदार साहेब त्यांना उमेदवारी देतील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असे आवाहन दत्तानाना ढमाळ यांनी केले.
यावेळी दयानंद खरात, लक्ष्मण शेळके, राजुभाई इनामदार, पृथ्वीराज शेळके, जावेद पटेल, सुरज शेळके, कय्युम मुल्ला यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोददादा क्षीरसागर यांनी केले.

या कार्यक्रमास डॉ. नितिन सावंत, दयानंद खरात, दत्ता नाना ढमाळ, मनोज पवार, विनोददादा क्षीरसागर, सचिन शेळके, किरण पवार, सागर शेळके, लक्ष्मणतात्या शेळके, शंकरराव शेळके, भरत शेळके, गणीभाई कच्छी, हेमंत कचरे, शफी इनामदार, विठ्ठल शेळके, राजूभाई इनामदार, दादा जाधव, रविंद्र क्षीरसागर, गजेंद्र मुसळे, गौरव फाळके, योगेश क्षीरसागर, जावेद पटेल, भरत बोडरे, कय्युम मुल्ला, आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!