मांढरदेव येथील श्री.काळेश्वरी देवी यात्रा रद्द केल्याने मंदिर भाविकांसाठी बंद; परिसरात नागरिकांसाठी प्रतिबंध; मोठा पोलीस बंदोबस्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१४ जानेवारी २०२२ । सातारा । मांढरदेव येथील श्री.काळेश्वरी देवी यात्रा रद्द करण्यात आली असून तेथे जमाव बंदी आदेश लागू केला आहे. या अनुषंगाने मांढरदेव देवस्थान ट्रस्ट ने मंदिर भाविकांसाठी संपूर्ण बंद केले आहे. पोलीस प्रशासनाने कोचळेवाडी फाटा येथे बंदोबस्त लावून मंदिराकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी प्रतिबंध केलेला आहे.या परिसराची पाहणी तहसीलदार रणजित भोसले,पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे,गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी केली मांढरदेव ग्रामस्थांशी चर्चा करून तेथे योग्य त्या सूचना केल्या. मांढरदेव येथील श्री.काळेश्वरी देवी यात्रा रद्द करण्यात आली असून तेथे जमाव बंदी आदेश लागू केला आहे.

या अनुषंगाने मांढरदेव देवस्थान ट्रस्ट ने मंदिर भाविकांसाठी संपूर्ण बंद केले आहे.आज सकाळी मांढरदेव यात्रा बंद केल्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने लावलेला बंदोबस्त त्याच प्रमाणे ग्रामपंचायत मांढरदेव व मंदिर ट्रस्ट यांनी केलेल्या उपाय योजना याच्या अनुषंगाने तहसीलदार रणजित भोसले,पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे,गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी पाहणी केली
त्याच प्रमाणे ग्रामपंचायत मांढरदेव येथे सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी चर्चा करून त्यांना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बाबत सूचना केल्या. सद्य परिस्थितीत मांढरदेव देवस्थान ट्रस्ट ने मंदिर भाविकांसाठी संपूर्ण बंद केले असून पोलीस प्रशासनाने कोचळेवाडी फाटा येथे बंदोबस्त लावून मंदिराकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी प्रतिबंध केलेला आहे.यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र राज्यातील लाखो भाविक दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यात्रेचा मुख्य दिवस शांकभरी पोर्णिमेला दि १७ जानेवारी रोजी आहे. या दिवशी तसेच प्रत्येक मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारी आणि आमवस्या, पोर्णिमेला अशी यात्रेपूर्वी १५ दिवस आणि यात्रेनंतर १५ दिवस याठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाईचे प्रांताधिकारी यांनी जमाव बंदीचा आदेश लागू केला आहे. यात्रा रद्द केल्याने १० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत या परिसरात जमावबंदी लागू केली आहे त्यामुळे या परिसरात कोणी गर्दी करू नये असे आवाहन तहसीलदार रणजीत भोसले,पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!