सातारा जिल्हा रुग्णालयातील नियम बाह्य अधिकारी-कर्मचारी प्रतिनियुक्ती रद्द करा कास्ट्राईब महासंघाचे जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.३०: महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ सातारा च्या वतीने जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्या संदर्भात सातारा जिल्हा रुग्णालयातीचे प्रभारी सातारा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांना निवेदन देण्यात आले . या नियमबाह्य नेमणुकांचा निषेध करण्यात आला आहे .

महासंघाच्या निवेदनात नमूद आहे की सातारा जिल्हा रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात असते घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयाचे बदनामी होत असते अशाच कारणावरून डॉ.अमोद गडिकर यांची बदली झाली आहे असे असताना सुद्धा रेमडिसिव्हर इंजेक्शन मुळे पुन्हा जिल्हा रुग्णालय ढवळून निघाले होते या प्रकरणावर पडदा पडतो न पडतो तोच वर्षानुवर्षे नियमबाह्य पद्धतीने वर्ग एक व वर्ग चार अधिकारी-कर्मचारी यांची नियमबाह्य पद्धतीने प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे असे समोर येत आहे या प्रकारामुळे सुद्धा सातारा जिल्हा रुग्णालय पुन्हा नवीन वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे आणि प्रतिनियुक्ति द्वारे ठाण मांडून बसलेले कर्मचारी अधिकारी नियमबाह्य व चुकीचे कामे करत आहेत असा आरोप करण्यात आला आहे प्रतिनियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांमुळे आणि चुकीच्या प्रकारामुळे प्रामाणिक अधिकारी व कर्मचारी यांना विनाकारण त्रास होत आहे त्यामुळे प्रतिनियुक्ती रद्द करा आणि नियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त करा असे असे नमूद करण्यात आले आहे आणि याचा अहवाल संघटनेस अवगत करा म्हणजे संघटनेस आंदोलनाबाबत निर्णय घेता येईल अशा आशयाची मागणी या वेळी करण्यात आली .

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे आणि पुणे विभागीय सचिव सिद्धार्थ खरात उपस्थित होते


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!