स्थैर्य, सोलापूर, दि.18 : कोविडची बाधा झालेल्या रुग्णांना उपचारासाठी उपयुक्त ठरणारी चार बायपॅप मशिन आज कॅनरा बँकेतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयाला (सिव्हील हास्पिटल) देण्यात आले.
कॅनरा बँकेच्या सीएसआर निधीतून ही मशिनरी सोलापूर महानगरपालिकेला देण्यात आलेली होती. महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी ही मशिनरी आज सिव्हील कडे सुपूर्द केली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते. कॅनरा बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत सात लाख रुपये किंमतीचे फिलिप्स कंपनीची चार बायपॅप मशिन रुग्णालयाला देताना सोलापूर शहराप्रती असलेली जबाबदारी हातभार लावल्याचा आनंद होत आहे असे, कॅनरा बँकेचे विभागीय प्रमुख के.एस. उदय यांनी सांगितले.
यावेळी उपायुक्त अजयसिंह पवार, पंकज जावळे , अधिष्ठाता संजीव ठाकूर, कॅनरा बँकेचे डिव्हिजनल मॅनेजर श्री के के सी शबर व अधिकारी संजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.