
दैनिक स्थैर्य । 20 मार्च 2025। फलटण । येथील मुधोजी महाविद्यालयात येथे शुक्रवार दि. 21 मार्च रोजी करियर कौन्सलिंग आणि प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँकेमध्ये 31 जागासाठी रिलेशनशिप ऑफिसर या पदासाठी खपींर्शीींळशु चे आयोजन केले आहे. इ-, इ. उेा, इ.डल, इइ-, इउ-, इउड पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी तसेच पदवीधर व पदवीत्तर विद्यार्थी वरील मुलाखतीस पात्र असतील.
तरी नोकरीच्या आवश्यकता असणार्या सर्व उमेदवारांनी शुक्रवार, दि. 21 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता मुधोजी कॉलेज येथे ऊ-8 व ऊ-9 या वर्गात उपस्थित राहावे. हा खपींर्शीींळशु घेण्यासाठी आयसीआयसी बँकेकडून आशिष राऊत , हे पदाधिकारी व त्यांचे सहकारी येणार आहेत.
याप्रसंगी प्लेसमेंट सेल परीक्षा घेणार आहेत. या परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन व लेखी स्वरूपाचे आहे. त्यापैकी ऑनलाईन माध्यमातून 15 मिनिटाची 20 मार्कची परीक्षा होईल. यामध्ये विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता, बँकेमधील कर्मचार्यांसाठी आवश्यक असणारी कौशल्य याबद्दल प्रश्न विचारले जातील.
यातून निवड झालेली उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतील. अधिक माहितीसाठी प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रशांत शेटे (9860303346) यांच्याशी संपर्क साधावा. असे आव्हान मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी देणे हा या कॅम्पस इंटरव्यूचा महत्त्वाचा उद्देश आहे. तरी या संधीचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.