नामांकित बँकांचे मुधोजी महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्हीव्यू


दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण येथील मुधोजी महाविद्यालयामध्ये राज्यासह देशातील नामांकित खाजगी बँकांचे दि. ०५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता कॅम्पस इंटरव्हीव्यू आयोजित केले असून २६ वर्षापेक्षा कमी असणाऱ्या कुठल्याही शाखेच्या पदवीधर विद्यार्थांनी मुधोजी महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मुधोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पी. एच. कदम यांनी केलेले आहे.

याबात अधिक माहिती देताना प्रभारी प्राचार्य पी. एच. कदम म्हणाले कि, IFBI & NIIT यांच्या तर्फे मुलाखती होणार आहेत. नोकरीसाठी सदरील मोठी संधी उपलब्ध होत आहे. तरी २६ वर्षापेक्षा कमी असलेला कुठल्याही शाखेचा पदवीधर विध्यार्थी किंवा तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुधोजी महाविद्यालयात संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!