
स्थैर्य, फलटण, दि. 28 नोव्हेंबर :प्रभाग ११ मध्ये शिवसेनेचे उमेदवार कृष्णाथ तथा दादासाहेब चोरमले यांनी प्रचारात पायला भिंगरी लावून मोठा वेग घेतला आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे.
दादासाहेब चोरमले सध्या घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत, राजे गटाचे विकासकार्य त्यांना पटवून देत आहेत.
शहराच्या विकासासाठी आणि स्थिर प्रशासनासाठी शिवसेनेचे नेतृत्व आवश्यक आहे, असे ते मतदारांना समजावून सांगत आहेत.
एकंदरीत, घरोघरी जाऊन भेटीगाठी घेऊन दादासाहेब चोरमले यांनी मतदानाचे आवाहन तीव्र केले आहे. राजे गटावरील विश्वास कायम ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

