
स्थैर्य, निंबळक, दि. 8 ऑक्टोबर : येथील श्री निमजाई देवी ग्रामविकास पॅनल आणि उद्योजक रामसाहेब निंबाळकर यांच्या सहकार्याने, गावातील नागरिकांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
या कॅम्पमध्ये अनेक नागरिकांना बांधकाम कामगार कार्डांचे वाटप करण्यात आले. तसेच, मोफत भांड्यांच्या संचाचा लाभ मिळवण्यासाठी १७० कामगारांची बायोमेट्रिक पद्धतीने ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. ज्यांची नोंदणी यापूर्वी झाली होती, अशा लाभार्थ्यांनाही कार्डांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच सिमा बनकर, संजय कापसे, काशिराम मोरे, संतोष गावडे, शरद झेंडे, राजेंद्र मदणे, विकास भोसले, उदय भोसले, हरिभाऊ भोसले, पंकज निंबाळकर, विद्याधर यादव, धनंजय भोसले आणि काशिनाथ शिंदे उपस्थित होते.