दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२१ । सातारा । समग्र शिक्षा समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत मुकुल फाऊडेंशनच्यावतीने 25 नोव्हेंबर रोजी छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरासाठी पुणे येथील 30 डॉक्टरांच्या पथकामार्फत तपासणी करण्यात आली असून ज्या विद्यार्थ्यांना अंशत: मोफत थेरपी व शस्त्रक्रिया मुकुल फाऊडेंशनच्यावतीने करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
25 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या शिबीरास जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धनंजय चौपडे, बबलु मोकळे आदी उपस्थित होते.
समग्र शिक्षा समवेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षण पूर्ण करतांना कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत ग्रामीण, निमशहरी भागातील विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा शोध घ्यावा. अशा बालकांची राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शाळा स्तरावर तपासणी आणि तालुकास्तरीय दिव्यांग निदान उपचार शिबीरात वैद्यकीय तपासणी करावी. तसेच ज्यांचा फिजिओ व स्पिच थेरपीची गरज आहे अशा मतीमंद, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, अस्थिव्यंग, कर्णदोष, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असलेल्या विद्यार्थ्यांना गरजेनुसार थेरपीची आवश्यकता असते. अशा विद्यार्थयांना अंशत: मोफत थेरपी व शस्त्रक्रिया मुकुल माधव फौंडेशन, पुणे यांच्याकडून करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनाय गौड यांनी दिली.