
दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२२ । सातारा । साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील ( मांग, मातंग, मिनी मादिग, मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा ) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत भागभांडवली अंशदानाचे निधीतून थेट कर्ज योजनेअंतर्गत महामंडळाने निश्चित केलेल्या जिल्हानिहाय भौतिक व आर्थिक उद्दिष्टासाठी कर्ज मागणी अर्ज मिळण्याची व स्विकारण्याचा दि. 28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सातारा (02162-298114) येथे संपर्क साधावा.