
दैनिक स्थैर्य । 11 मे 2025। सातारा। येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्यावतीने देण्यात येणार्या अक्षरगौरव साहित्य पुरस्कारांसाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून या ग्रंथालयाच्यावतीने साहित्यिक उपक्रम, व्याख्याने व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. याचा भाग म्हणून उत्कृष्ट साहित्यकृतींना राज्यस्तरीय भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ अक्षरगौरव पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कारांचे हे 14 वे वर्ष आहे.
जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या वर्षात प्रकाशित दोन उत्कृष्ट साहित्यकृतींना अक्षर गौरव साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. 2500 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. जिल्ह्यातील दोन लेखकांना ’अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार’, तर आरोग्य विषयक ग्रंथालाही डॉ. श्रीकांत कारखानीस स्मृत्यर्थ पुरस्कार देण्यात येणार असून, एक हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. साहित्य क्षेत्रातील जाणकारांच्या निवड समितीकडून साहित्यकृतींची निवड केली जाईल.
या पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशकांनी आपल्य साहित्यकृतीच्या दोन प्रती अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाकडे 30 जूनपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन संस्थापक रवींद्र भारती- झुटिंग क अध्यक्ष साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे. या पुरस्काराबाबत सर्वाधिकार निवड समितील राहतील. पुरस्कार वितरणार्च तारीख नंतर कळवली जाईल. य पुरस्कारासाठी विनामूल्य प्रवेश घेता येईल. पुरस्काराचे वितरण साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्य हस्ते करण्यात येणार असल्याच्चे कार्यवाह शशिभूषण जाधव यांन सांगितले.