तरडगावमध्ये घंटागाडीवरून ई-पीक पाहणीचे आवाहन; फलटणच्या प्रांताधिकार्‍यांचा अनोखा उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यामध्ये शासनाच्या निर्देशानुसार ई-पीक पाहणीची जास्तीत जास्त नोंदणी शेतकर्‍यांनी करावी यासाठी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी अनोखा उपक्रम राबवत तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये घंटागाड्यांची सोय आहे, त्या घंटागाड्यांच्या स्पीकरवरून ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकर्‍यांना आवाहन करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण महसूल विभाग शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी करून नोंदणी करण्याचे आवाहन करत होते. त्यानंतर आता थेट घंटागाड्यांच्या स्पीकरवरून आवाहन करण्यात येत असल्याने आगामी काळामध्ये तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांनी ई पीक पाहणीची नोंदणी करावी; असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!