दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२२ । फलटण । परवाच एक वयस्कर आजी कंबरदुखी साठी दाखवायला आली होती. मी सहज विचारले की काही गोळ्या चालू आहेत का? तर तिने एक कॅल्शियम ची गोळी रोज १ घेत असल्याचे सांगितले. किती दिवस घेताय असे विचारल्यावर उत्तर ऐकून मी हाबकलो . ती आजी कॅल्शियम च्या गोळ्या साधारण दोन वर्षांपासून रोज घेत होती.
असे कित्येक पेशंट्स असतात की जे कॅल्शियम सारख्या गोळ्या वर्षानुवर्षे घेत असतात आणि ते सुद्धा काही वेळा डॉक्टरांच्या सल्याशिवाय 😔.
आता इथे बरेच प्रश्न उपस्थित होतात.
१. आपल्या शरीराला कॅल्शियम ची खरंच किती गरज असते.
२.कॅल्शियम या खनिजाचे शरीराला काय काय फायदे होतात.
३.कॅल्शियम ची कमतरता कशा मुळे होते आणि ती कशी ओळखावी.
४.कॅल्शियम च्या कमतरतेमुळे काय काय आजार होतात.
५.कॅल्शियम ची कमतरता कशी टाळावी व ती भरून काढण्यासाठी गोळ्या किती आणि कशा घ्याव्या?
प्रत्येक प्रश्नाची सविस्तर उत्तर बघुयात.
१. आपल्या शरीराला कॅल्शियम ची खरंच किती गरज असते.
साधारण 800mg ते 1000mg कॅल्शियम रोज शरीराला आवश्यक आहे . वया नुसार त्याची गरज बदलते. लाहानमुलांना कमी लागते आणि वयोवृद्धiना ते जास्त प्रमाणात लागते.
रोजचा सकस आहार जर व्यवस्थित घेतला तर कॅल्शियम आपल्याला आहारातूनच मिळू शकते.
२. कॅल्शियम चे आपल्या शरीराला काय काय फायदे आहेत?
कॅल्शियम हे खनिज आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे.
हाडे बळकट करण्यासाठी आणि त्याच्या जडणघडणीसाठी त्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो.
दाता मध्ये इनामल आणि डेंटीन अशे दोन घटक असतात , या दोन्ही च्या बळकटी साठी कॅल्शियम लागते.त्यामुळे दाताचे आरोग्य हे कॅल्शियम वर खूप अवलंबून आहे.
स्नायूंना बळकट करण्यासाठी प्रोटीन बरोबर कॅल्शियम पण आवश्यक आहे.
प्रत्येक पेशी दीर्घायु होण्यासाठी पण कॅल्शियम आवश्यक आहे.
हृदयाचे काम नीट चालण्यासाठी पण कॅल्शियम आवश्यक आहे.
रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी सुद्धा कॅल्शियम फार आवश्यक आहे .
३. कॅल्शियम ची कमतरता कशामुळे होते आणि ती कशी ओळखावी?
बऱ्याच लोकांमध्ये असे आढळून येते की आहार तर चांगला आहे पण तरी कॅल्शियम deficiency आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बिघडलेली पचन संस्था आणि व्हिटॅमिन D चा अभाव .
व्हिटॅमिन D deficiency ही सध्या खूप लोकांमध्ये दिसून येते आणि कॅल्शियम च्या absorption मध्ये त्याचा मोठा वाटा आहे. आहारात जरी आपण भरपूर कॅल्शियम घेतले आणि vitamin D जर शरीरात कमी असेल तर कॅल्शियम साहजिकच शरीरात शोषले जाणार नाही आणि मला वाटे टाकून दिले जाईल.
आता कॅल्शियम ची कमतरता कशी ओळखावी?
दिसणारी लक्षणे काय आहेत!
हाडे दुखणे , लवकर थकवा येणे, दातातून रक्त येणे , दात लवकर पडणे , स्नायूंची ताकत कमी होणे , कंबर आणि मान दुखणे आणि पुढे जाऊन हाडे पटकन मोडणे.
Menopause नंतर स्त्रियांमध्ये ह्याचे प्रमाण खूप जास्त दिसून येते कारण estrogen ह्या हार्मोनचे secretion menopause नंतर बंद होते आणि त्यामुळे हाडातून कॅल्शियम निघून जाते.
कॅल्शियम ची कमतरता ही स्त्रियां मध्ये पुरुषांपेक्षा चौपट(४पट) आढळते.
Blood investigations काय करावीत.
Serum Calcium – नॉर्मल range ८ ते १० mg/dl अशी आहे .
Serum Vitamin D3 – नॉर्मल लेव्हल ३० mg/dl च्यापुढे समजली जाते.
हे दोन्ही दर वर्षी तपासून च्यावे.
Bone Densitometry किंवा
DEXA scan ह्यामध्ये हाडाचा ठिसूळ पणा किती आहे याचे प्रत्यक्ष मोजमापच मिळते. त्याचा T score हा -1(उणे १) च्या खाली नसावा.
४. कॅल्शियम च्या कमतरतेमुळे काय काय आजार होतात?
हाडे लवकर मोडणे ,
कंबर आणि मान अवघडणे आणि दुखणे.
दात दुखणे आणि लवकर पडणे.
हृदयाचे ठोके वाढणे, छातीत धड – धड होणे.
स्नायूंची ताकद कमी होऊन अशक्त पणा कमी होणे.
सर्वात महत्त्वाचे प्रतिकार शक्ती कमी होणे आणि मग सहज कोठलेही आजार (इन्फेक्शन) होणे.
५.कॅल्शियम ची कमतरता कशी टाळावी व ती भरून काढण्यासाठी गोळ्या किती आणि कशा घ्याव्या.
Prevention is Always Better Than Cure.
*नियमित व्यायाम करावा. जसे की चालणे, सावकाश धावणे, योगासने , प्राणायाम, पोहणे, cycling .
सकाळचे सूर्योदयानंतर चे कोवळे उन अंगावर घेणे व्हिटॅमिन डी साठी अती उत्तम.
व्यसनमुक्त आणि तणावमुक्त जीवनशैली अंगिकारावी .*
कॅल्शियम युक्त आहार घ्यावा जसे की दूध, हिरव्या पालेभाज्या, बीट, सुकामेवा (खारीक खजूर, बदाम ,अक्रोड , पिस्ते) , डाळी.
नाचणी चे सत्व ह्या मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
मासे व अंडी ह्या मध्ये पण कॅल्शियम असते .
हाडांच्या खोडक्यांपासून बनवलेले सूप .
कोणते पदार्थ टाळावे
खारवलेले पदार्थ, कॉफी, चॉकलेट , दारू, शीतपेये, आणि पित्ता वरील काही विशिष्ट औषधे टाळावीत.
कॅल्शियम च्या गोळ्या किती आणि कश्या घ्याव्यात.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कॅल्शियम च्या गोळ्या ५००mg रोज दोन असे महिनाभर घ्यावे. त्यानंतर ज्यांना कॅल्शियम ची खूप कमतरता आहे त्यांनी ३महिने continue ठेवावे आणि मग परत एक महिना गाप देऊन serun कॅल्शियम चेक करूनच पुढचा डोसे घ्यावा.
कॅल्शियम बरोबर व्हिटॅमिन D घेणे पण गरजेचे आहे .
दर आठवड्याला एक sacchet किंवा लिक्वीड ( ६०००० iu ) मात्रा असलेले असे १२आठवडे सलग घ्यावे आणि मग Serum व्हिटॅमिन D चेक करूनच पुढील डोस डॉक्टरांच्या सल्या ने घ्यावा.
वर्षानुवर्षे कॅल्शियम च्या गोळ्या अजिबात घेऊ नये त्याने मूतखडे होण्याची शक्यता खूप वाढते.
तर प्रियजन हो ,
असुदेत तुमचा कॅल्शियमचा उत्तम पट्,
होईल हड्डी, दंत आणि मास पेशी बळकट,
नक्कीच कमी होईल आयुष्यात तब्येतीची कटकट,
व्हाल दीर्घायुषी , सुदृढ आणि अधिक दणकट!!
🤗🙏
जनहितार्थ जारी
डॉ प्रसाद जोशी
अस्थिरोग शल्य चिकित्सक
जोशी हॉस्पिटल प्रा ली
फलटण.