स्थैर्य, सातारा, दि.२: राष्ट्रवादी काॅंग्रेसने सातारा पालिका निवडणुक लढविण्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले आहे, तुम्हांला काय वाटते या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी चालतंय की असे उत्तर दिले.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान झाले. आमदार शिवेंद्रसिंहराजे हे सातारा आणि जावळी या दाेन तालुक्यांचे आमदार असल्याने साता-यातील मतदान केंद्रांना भेट दिल्यानंतर ते जावळी खाे-यात गेले. तेथील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. मतदान केंद्रांना भेट दिल्यानंतर साता-याकडे रवाना हाेत असताना त्यांना पत्रकारांनी गाठले.
राष्ट्रवादी काॅंग्रेस सातारा पालिकेची निवडणुक लढविणार आहे. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकतेच जाहीर केले आहे या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले चालतंय की, लाेकशाहीत प्रत्येकाला अधिकार दिलेत आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याचा अधिकार देखील सर्वांना असल्याचे त्यांनी नमूद केले.