
स्थैर्य, फलटण दि.२८: आज रासायनिक शेतीचे दुष्परिणाम व तोट्यात येणारी शेती यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक दुष्टचक्रात जात असताना त्याला स्वतःच्या कुटुंबियांसाठी व भारतवासियांसाठी सेंद्रिय शेतमाल मिळवून देणे हे एक आव्हान बनले आहे. या आव्हानांना सामोरे जाताना व रेसिड्यू-फ्री शेतमालाचे उत्पादन घेताना शेतकर्यांसाठी सर्वात आव्हानात्मक आहे ते म्हणजे पिकांवरील रोग व किडींचे नियंत्रण करणे. आजपर्यंत भारतात भेसळमुक्त सेंद्रिय औषधे मिळणे हे शेतकर्यांना जीकीरेचे होते आणि जोपर्यंत कीड व रोग नियंत्रण होत नाही तोपर्यंत फायदेशीर शेतीचा विचार शेतकरी करू शकत नव्हता.
के.बी. एक्स्पोर्टस कंपनीच्या माध्यमातून गेल्या १५ टे २० वर्षांपासून करार पद्धतीने शेती करत असताना शेतकर्यांची ही गरज ओळखून ५ वर्षांपूर्वी के.बी. एक्स्पोर्ट कंपनीचे संचालक मा.श्री. सचिन यादव यांनी संशोधन व विकास विभाग स्थापन करून बोटॅनिकल आधारित अल्कोलाईड बेस सेंद्रिय उत्पादने प्रत्येक किडीसाठी व रोगांसाठी निर्माण केली आहेत. ही सर्व उत्पादने रासायनिक औषधांच्या तोडीस तोड, ४८ तासात तत्काळ सर्व प्रकारच्या किडी व रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण करणारी आणि कोणतेही केमिकल, भेसळ नसणारी, अपेडा मान्यताप्राप्त ‘इकोसर्ट’ संस्थेकडून सेंद्रिय शेतीस मान्यताप्राप्त असलेली ‘पेटंट’ सुरक्षित तसेच निमवर आधारित उत्पादने ‘सीईआयबी’ रजिस्टर आहेत.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी ज्या प्रमाणे भारत देशाने पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात पदार्पण केले होते त्याच दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२० पासून के.बी. बायो-बायो-ऑरगॅनिक्स कंपनीने आपली सर्व उत्पादने वितरीत करून रासायनिक औषधांच्या पारतंत्र्यातून शेतकर्यांना मुक्ती दिली आहे. गेल्या ५ वर्षांपासून या औषधांवर संशोधन केले असून, कंपनीने शेतकर्यांच्या करार शेतीमध्ये याची फवारणी करून कीड व रोगाचे उत्तम नियंत्रण करून निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन घेऊन तो माल युरोपमध्ये निर्यात केला असल्याची माहिती कंपनी प्रतिनिधी यांनी दिली. तसेच थ्रीप्स व डाउनी मिलड्यू साठी भारतात सर्वोत्कृष्ट औषध असल्याचे शेतकरी बांधवानकडून सांगण्यात येत आहे.
सर्व शेतकर्यांनी नक्कीच प्रायोगिक तत्वावर या औषधांचा वापर करून कंपनीच्या ‘सेंद्रिय शेती’ मोहिमेत सहभागी होऊन निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन घेऊन आर्थिक सक्षम बनावे अशी अपेक्षा कंपनीचे संचालक मा.श्री. सचिन यादव यांनी केली.