
स्थैर्य, 21 मार्च, सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीबाबत सध्या महत्वाची प्रक्रिया सुरू आहे. 2026 मध्ये होणार्या या पोटनिवडणुकीसाठी 138 ग्रामपंचायतीतील 206 रिक्त जागा आहेत. यामध्ये 172 सदस्य थेट सरपंचपदाच्या 34 जागांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील विविध कारणांनी रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये अकरा तालुक्यांतील 138 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
सातारा तालुक्यातील 13, कन्हाड 20, पाटण 20, कोरेगाव 16, चाई अकरा, खंडाळा एक, महाबळेश्वर 18, जावळी 23, फलटण आठ, माण चार, खटाव चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतीतील 206 सदस्यांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण थेट सरपंचपदाच्या 34 जागांसाठी चुरस असेल. त्यासाठी सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी यामध्ये लक्ष घातले जाणार आहे. थेट सरपंचपदाच्या सातारा पाच, कन्हाड आठ, पाटण सहा, कोरेगाव तीन, वाई दोन, महाबळेश्वर पाच,सातारा, कन्हाड, फलटण आणि पाटण यांसारख्या मोठ्या तालुक्यांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण अधिक आहे.
जावळी तीन, फलटण दोनसदस्यपदाच्या 172 जागांमध्ये सातारा 12, कर्हाड 18, पाटण 17, कोरेगाव 18, वाई 20, खंडाळा एक, महाबळेश्वर 28, जावळी 33, फलटण 15, माण चार, खटाव सहा सदस्यांचा समावेश आहे. ही पोटनिवडणूक प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे.
यामध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील अनेक ठिकाणी उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने,
कोणाचाही अर्ज न आल्याने किंवा काही सदस्यांच्या राजीनाम्यामुळे या जागा रिक्त राहिल्या आहेत.
काही गावांमध्ये सरपंचांनी राजीनामा दिल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे थेट सरपंचपदासाठीही चुरस पाहायला मिळणार आहे. यामध्ये स्थानिक नेतेही लक्ष घालणार आहेत. त्यामुळे सरपंचपदाच्या निवडणूक अटीतटीची व चुरशीची होणार आहे. ज्या गावांमध्ये पोटनिवडणूक आहे, तिथेच आचारसंहिता लागू राहणार आहे.

