दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२२ । सातारा । येथील महिंद्रा हॉटेलच्या परिसरात ग्लोबल वर्कशॉप येथे व्यावसायिकाला धमकी दिल्याबद्दल एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी स्वत: वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी भेट दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमीर हुसेन शेख वय ३९ याने दिलेल्या फिर्यादीवरून तो चप्पल बूटचा व्यवसाय करतो. त्याला आकाश उर्फ बाळा खुडे वय ३४, रा. करंजे पेठ याने सनी आयवळे याच्यावर टाकलेली मोक्याची केस मागे घे नाहीतर ते लोक तुला गायब करून टाकतील अशी धमकी दिली. याबाबतचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुसळे या करत आहेत.