फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवसाय विकास आराखडा जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ मे २०२३ | फलटण |
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा सन २०२३-२४ ते २०२८-२९ चा व्यवसाय विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याअनुषंगाने करण्यात येणारी कामे जाहीर करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. या सर्व कामांची माहिती बाजार समितीचे नवनिर्वाचित सदस्य, शेतकरी, अडते, खरेदीदार, हमाल, मापाडी व सर्व स्टाफ यांनी घ्यावी, असे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांनी केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पुढीलप्रमाणे कामे करण्यात येणार आहेत.

१) कांदा मार्केट विकसित करण्याकरीता अडते, खरेदीदार यांच्या मागण्या विचारात घेणे. खरेदीतील अडत्यांचा सहभाग वाढविणे तसेच नवीन खरेदीदारांना लायसन्स देणे.
२) तालुयाच्या कार्यक्षेत्रात ७०० ते ८०० हेटर परिसरावर कापूस पीकपेरा पसरला असल्याने कापूर खरेदी-विक्रीची व्यवस्था करणे. शेतमाल तारण कर्ज योजना, बियाणे व मार्गदर्शन, प्रक्रिया उद्योग आणि कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे सेंटर सुरू करणे.
३) श्रीमंत शिवाजीराजे फळे व भाजीपाला मार्केटचे विस्तारीकरण करणे. नवीन १०० गाळे प्राधान्याने मंडईचे पूर्वीचे व्यावसायिक, शेतकर्‍यांची मुले तसेच सहकारी संस्था यांना अडत व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात येतील.
४) भाडेवाढ, ट्रान्सफर व वर्गीकरण फी च्या बाबतीत लिजधारक व बाजार समिती यामध्ये उचित समन्वय ठेवून स्वतंत्र धोरण तयार करून समितीचे उत्पन्न वाढविणे.
५) महाराजा प्रतापसिंह मालोजीराव मेमोरियल फार्मर्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणे.
६) शरद भवन – शेतकरी व्यापारी संकुल, मार्केट यार्ड, फलटणची उभारणी करणे.
७) उर्वरित पेट्रोलपंपांची उभारणी बरड, तरडगाव, फरांदवाडी (पेट्रोल-डिझेल व सीएनजी), मिरगाव, खडकीपाटी, पिंपळवाडी, सोमंथळी, तांबवे इ.
८) शेतकरी व्यापारी निवास तसेच शेतकरी व सर्व मार्केट फंशनरीज यांना मार्केट यार्डमध्ये मूलभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देणे.
९) बाजार समितीचे कार्यक्षेत्रात जमीन खरेदी करणे.
१०) शेतकरी, हमाल, मापाडी यांचेबाबतीत कल्याणकारी योजना राबविणे.
११) मार्केट यार्ड, फलटण येथे पीपीपी तत्त्वावर शेतकर्‍यांकरीता जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी-विक्रीबाबत दुकाने सुरू करणे.
१२) कृषी उत्पन्न बाजार समिती, शासनाचा पशूसंवर्धन विभाग यांच्या संयुत विद्यमाने अ‍ॅड. विश्वंभर झिरपे तालुका लघु पशूसंवर्धन चिकित्सालय, मार्केट यार्ड, फलटणच्या माध्यमातून पशूधनाच्या बाबतीत विस्तार विषयक कार्यक्रम राबविणे, जनावरे, शेळी-मेंढी बाजार विकसित करणे.


Back to top button
Don`t copy text!