
पोलिसांकडून धरपकड : केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
स्थैर्य, सातारा, दि. 9 : कोरोना काळात लॉकडाऊनमुळे युवक बेरोजगार झाले आहेत. या युवकांना रोजगार द्या, अशी जोरदार मागणी करत सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज केंद्र सरकारकविरूद्ध रोजगार दो, और अभी दो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी त्यांची पोलींसासोबत धरपकड झाली.
भारतीय युवक काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी येथे ध्वजवंदन करण्यात आले. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व सातारा जिल्हा युवक काँग्रेसतर्फे सातारा येथील शहीद स्मारक येथे जाऊन शहीदांचे स्मरण करून पुष्पार्पण अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नोटबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी अशा चुकीच्या धोरणांमुळे आणि कोरोनाच्या काळात काहीही नियोजन न करता घोषित केलेला लॉकडाऊन आणि पुढचे चुकलेले व्यवस्थापन यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार नष्ट झाले असल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेसचे याठिकाणी केंद्र सरकारच्याविरोधात जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारकविरूद्ध रोजगार दो, और अभी दो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
त्यानंतर कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी त्यांची पोलींसासोबत धरपकड झाली.
राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, निवास थोरात जि. प. सदस्य सातारा, बाबासाहेब कदम, रजनीताई पाटील, बाळासाहेब शिरसाट, मनोजकुमार तपासे, सौ. धनश्रीताई महाडिक, अध्यक्षा सातारा जिल्हा महिला काँग्रेस, सौ. माधुरी जाधव, आनंदाभाऊ जाधव, बाबूराव शिंदे, शैलेश चव्हाण, अभिजित चव्हाण, जितेंद्र यादव, वैभव पवार, आमित जाधव, वैभव थोरात, अजित भोसले, विक्रमसिंह चव्हाण, प्रमोद अनपट, सागर गायकवाड, पै. गणेश शिंदे, जिल्हा युवक काँग्रेस कमिटी पदाधिकारी, विधानसभा पदाधिकारी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.