धुळदेव बसस्थानकासमोर एसटी बस जळून खाक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ फेब्रुवारी २०२२ । म्हसवड । म्हसवडनजीक धुळदेव बस स्थानकासमोरच सातारा वरुन सोलापूरकडे 44 प्रवासी घेऊन निघालेल्या बसच्या इंजिन मधुन अचानक धुराचे लोट व जाळ निघाला. बसचालकाने प्रसंगावधान राखत विलंब न करता बस मधील 44 प्रवाशी पाठीमागील संकटकालीन दरवाजातून खाली उतरवले. यानंतर बसवाहक व चालकाने म्हसवड पालिकेच्या अग्निशमन, म्हसवड पोलीस स्टेशन व दहिवडी डेपो यांना या घटनेची बाबत माहिती दिली. अग्निशमन गाडी येईपर्यंत बसची ड्रायव्हरकेबीन जळून खाक झाली होती. चालकाने दाखवलेल्या तत्परतेने 44 प्रवाशी बचावून मोठी दुर्घटना टळली.

याबाबत घटनास्थळावरुन चालक शंकर रामचंद्र पवार रा. आष्टी, ता. कोरेगांव जिल्हा सातारा यांनी सांगितलेली माहिती अशी, शनिवारी सकाळी 10 वाजता चालक शंकर पवार व वाहक सुधीर जाधव यांनी 45 प्रवाशी घेऊन सातारा वरुन सोलापूरकडे निघाले होते. म्हसवड बस स्थानकात काही प्रवाशी उतरले. बसमध्ये 40 प्रवाशी घेऊन दुपारी सव्वा ते दिड च्या दरम्यान म्हसवड पासुन 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या धुळदेव बस स्टॅण्डवर एक प्रवाशी उतरण्यासाठी बस थांबली. यावेळी अचानक बसमधुन धुर येवू लागला. चालक पवार यांनी तत्काळ वाहक सुधीर जाधव यांना बसच्या पाठीमागील बाजुस असलेल्या संकटकालीन दरवाजा उघडण्यास सांगत प्रवाशी यांना त्या दरवाजातून प्रवाशी उतरवले. प्रवासी उतरत असतानाच बसच्या पुढील डायव्हिंग केबीनने जोराचा पेट घेतला. थोड्याच वेळात बसने आकराळविक्राळ रुप धारण केले. तत्पूर्वी सर्व प्रवाशी सुखरुप स्थळी चालक व वाहक यांनी त्यांच्या साहित्यासह बाहेर काढून म्हसवड नगरपालिकेच्या अग्निशमन, पोलीस स्टेशन व दहिवडी सातारा डेपोला या घटनेची बाबत माहिती दिली. म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय बाजीराव ढेकळे, किरण जाधव व इतर कर्मचारी व म्हसवड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रविण पिसे पाणी पुरवठा विभागाचे प्रकाश लोखंडे व नवनाथ वलेकर आदी पालिका कर्मचारी आगीच्या ठिकाणी पोहचले व आग आटोक्यात आणली. पेटलेल्या बसच्या डिझेल टाकीने पेट घेण्याआधी अग्निशमन पोहचले अन्यथा डिझेल टँक फुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. आगीमुळे बसचा सांगाडा फक्त राहिला होता.

घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात देण्यात आली असून तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे एपीआय बाजीराव ढेकळे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!