स्थैर्य, सातारा, दि.११: कृष्णानगर, सातारा येथे एका गोडावूनमधून बॅटर्या चोरणार्या तीन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा येथील बाँबे रेस्टॉरेंट चौकात सापळा लावून अटक केली. रोहित जितेंद्र भोसले वय 24, अविनाश राजाराम भिसे वय 24, प्रकाश राजेंद्र शेडगे वय 22 तिघे रा. प्रतापसिंहनगर, सातारा अशी चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून छोटा हत्ती टेम्पो, 8 बॅटर्या असा 4 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, प्रतापसिंहनगर सातारा येथून बॉम्बे रेस्टॉरंट बाजूकडे पोलीस अभिलेखावरील आरोपी व त्याचा साथिदार हे छोटा हत्ती (एमएच 11 सीएच 5674) मधून जलसंपदा विभाग वसाहत कृष्णानगर सातारा येथून चोरलेल्या बॅटरीज विक्रीसाठी घेवून चालले आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या अनुषंगाने पथकाने बॉम्बे रेस्टॉरन्ट परिसरामध्ये थांबून सापळा लावला. सायंकाळी 7 च्या सुमारास संबंधित वाहन कोरेगाव बाजूकडून सातारा बाजूकडे येताना दिसले. वाहनास थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये 8 बॅटरी आढळून आल्या. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी बॅटर्या कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाचे गोडावूनमधून चोरल्या असून त्या विक्री करण्याकरीता घेवून जात असल्याचे सांगितले. या बॅटरी चोरीप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्या घरफोडीचा चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत तिन सराईतांना जेरबंद केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उत्तम दबडे, पो. हवा, कांतीलाल नवघणे, अतिष घाडगे, पो. ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, अमित सपकाळ, पो. कॉ. विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, धीरज महाडीक, गणेश कचरे यांनी ही कारवाई केलेली आहे.