उंब्रज येथे पन्नास हजारांची घरफोडी


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । सातारा । चरेगाव, तालुका कराड गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली असल्याची फिर्याद उंब्रज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 3 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुरेश परशुराम माने वय 64 राहणार चरेगाव, तालुका कराड यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने कशाने तरी तोडून, घरात प्रवेश करून, घरातील गोदरेज कपाटाचे लॉकर तोडून पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, एक ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी तसेच एक हजार रुपये रोख असा एकूण 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या गुन्ह्याची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस हवालदार वाय. के. पवार अधिक तपास करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!