दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२१ । मायणी । दोनच दिवसांपूर्वी मायणी येथे पिस्तूलचा धाख दाखवून ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न केला. आजून पोलीस सदर घटनेचा तपास करीत आहेत तो पर्यंतच हिवरवाडी येथील अँड पी डी सावंत यांचाच घराला चोरट्यानी टार्गेट केले. बंद घर फोडून जवळपास सहा लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.
सदर घटनेची फिर्याद स्वतः अँड पी डी सावंत यांनी मायणी पोलीस स्टेशनला दिली आहे .दिलेल्या माहिती नुसार अँड सावंत यांचे आई व वडील हे दोघेही हिवरवाडी येथे वास्तव्यास असतात तर स्वतः सावंत व त्यांचे बंधू असे एकत्र व्यवसायासाठी वडूज येते वास्तव्यास आहेत. गेल्या आठवड्यात अँड सावंत यांच्या वडिलांच्या गुडग्यांचे ऑपरेशन झाले असल्याने त्यांचे कुटुंब सध्या वडूज येथे वास्तव्यास होते .
काल ते स्वतः व आई सकाळी हिवरवाडी येथे आले होते दिवसभर शेतातील कामे करून संध्याकाळी ते परत वडुजला गेले .सकाळी त्यांच्या चुलत बंधूनी त्यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली .तत्काळ त्यांनी हिवरवाडी येथे येऊन पहाणी केली असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आसता घटनास्थळी मायणी येथील प्रभारी पोलीस उपनिरीक्षक पालेकर यांनी पाहणी करून सदर घटनेची माहिती वरिष्ठांना दिली .संध्याकाळी 5 वाजता स्वान पथक आले व कण्हरवाडी कडे गेले .अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पालेकर करीत आहेत.