दैनिक स्थैर्य । दि.०७ जानेवारी २०२२ । सातारा । जिहे ता. सातारा येथून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून २९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ रोजी ८.३० ते ५ जानेवारी रोजी ५.३० वाजण्याच्या सुमारास जिहे ता. सातारा तेथीलच कृष्णात दादासो फडतरे वय ४० यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी चोरुन आत प्रवेश करून कपाटात असलेले रोख २ हजार रुपये व २ हजार ५०० रुपये किंमतीचे लहान मुलांचे चांदीचे पैंजण चोरून नेले. तसेच कृष्णा फडतरे यांच्या घराशेजारी राहत असणाऱ्या ज्योती शंभूराज फडतरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतील २६ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल असा एकूण २९ हजार रुपयांची घरफोडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.