
स्थैर्य, सातारा, दि. 15 डिसेंबर : श्री सेवागिरी महाराजांच्या 78 व्या पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार, दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता नेची हिंदकेसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात का आल्याची माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे नूने मठाधिपती सुंदरगिरी महाराज व चेअरमन संतोष वाघ तर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रासह अन्य राज्यात प्रसिद्ध असलेल्या हिंदकेसरी शर्यतीकडे सर्व शौकिनांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी दोन लाख 78 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी एक लाख 71 हजार 78 रुपये, तृतीय क्रमांकासाठी एक लाख 51 – हजार 78 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी एक लाख 25हजार 78 रुपये, पाचव्या क्रमांकासाठी एक लाख 78 रुपये, सहाव्या क्रमांकासाठी 75 हजार 78 रुपये, सातव्या क्रमांकासाठी 50 हजार 78 रुपये, आठवा क्रमांक 40 हजार 78 रुपये, नववा क्रमांक 30 हजार 78 रुपये, दहावा क्रमांक 20 हजार 78 रुपये, अकरावा क्रमांक 15 हजार 78 रुपये व्यतिरिक्त एक ते 12 व्या क्रमांकाच्या प्रत्येक बैलगाडीला दोन ढाली देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांकाच्या गाडी चालकाला श्री सेवागिरी हिंदकेसरी ड्रायव्हर ही मानाची पदवी बहाल करण्यात येणार आहे. सेमी फायनल फेरीत क्रमांक घेणार्या प्रत्येक गाडी मालकाला उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.

