दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२३ | तरडफ |
शिवजयंतीनिमित्त तरडफ (ता. फलटण ) येथे रविवार, दि.१९ फेब्रुवारी रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी सरपंच रंजना संपत गोडसे व उपसरपंच रविंद्र शिवाजी पिसाळ यांच्या सौजन्याने रुपये ५१ हजार रुपये व ढाल, व्दितीय क्रमांकासाठी हणमंत शिवाजी पिसाळ (मुकादम संस्थापक) व राहुल आण्णासो मदने यांच्या सौजन्याने रुपये ३१ हजार व ढाल, तृतीय क्रमांकासाठी सुभाष ढवळे मुकादम व श्रीकांत शेठ फाळके यांच्या सौजन्याने रुपये ३१ हजार व ढाल, चतुर्थ क्रमांकासाठी अनिल शेठ खेडकर यांच्या सौजन्याने रुपये ११ हजार व ढाल, पाचव्या क्रमांकासाठी बैलगाडा शर्यत संघटना तरडफ यांच्या सौजन्याने रुपये ७ हजार व ढाल, सहाव्या क्रमांकासाठी संपत नामदेव गोडसे (संचालक, हिंदुस्तान को-ऑपरेटीव्ह बँक) यांच्या सौजन्याने रुपये ५ हजार व ढाल बक्षीसे देण्यात येणार आहेत.
बैलगाडा मालक व शौकिनांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन किरण जगदाळे, वैभव मदने व संयोजकांनी केले आहे.