फलटणच्या लक्ष्मीनगर येथील सराफा व्यापार्‍याची फसवणूक


दैनिक स्थैर्य | दि. २३ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील लक्ष्मीनगर येथे असलेल्या सद्गुरु ज्वेलर्समधील व्यापार्‍याचा विश्वास संपादन करून रणवीर शिंदे या ग्राहकाने ०१ ग्रॅम २६० मिली वजनाचे १०,४५० /- रुपये किमतीची कानातील सोन्याची बाळी पसंत करून फोन पे करतो असे सांगून पैसे न देताच पोबारा केल्याची घटना दि. २२/११/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सराफा व्यापारी दादासो निवृत्ती पावणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या फसवणुकीचा अधिक तपास सहा. पोलीस फौजदार अनिल भोसले करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!