देव असतो कायमच उभा, झर्यासारख्या निर्मळ मनाच्या माणसाच्या पाठीमागे कायम सावली बनून. आई-बाप लहानपणी वारले, मिळेल ते काम केलं, पण संकटांना ‘बुक्कीत टेंगूळ’ आणणारा सूरज अखेर ‘विनर’ झालाच…
देवाचा नैवेद्य खाऊन भूक भागवली आणि भुकेल्या पोटात पण एक देव असतो, त्याचं नाव माणूस. त्याला कुठल्याही देवाचा नैवेद्य चालतो, तो देव ओळखायला तू शिकवलंस, म्हणून कुणाच्या वाईट वेळेवर हसू नका, अपयशावर टाळ्या वाजवू नका, कुणाच्या गरिबीची चेष्टा करू नका, कुणाची वेळ कधी कुणाला ‘गुलिगत’ धोका देईल सांगता येत नाही. वेळेत फार मोठं सामर्थ्य आहे.
ज्याचं कुणीच नसतं त्याचा देव असतो. संकट येईल, लोक वेडा म्हणतील, अपमानित करतील, टिंगल करतील, आपलं मन सूरज इतकं निर्मळ आणि श्रध्दाळू ठेवा, दिवस बदलतात ‘sq, rq, zq’ सारखं…
– नवनाथ कोलवडकर (९२८४२१८११४)