सिमेंट, स्टील दरवाढीविरोधात दि.12 रोजी फलटण येथे बिल्डर्स असोसिएशनचे धरणे आंदोलन


स्थैर्य, फलटण दि.१०: बांधकामासाठी वापरण्यात येणार्‍या सिमेंट व स्टीलच्या अनैसर्गिक दरवाढी विरोधात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियांने शुक्रवार, दि.12 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभर एकदिवसीय धरणे आंदोलन छेडले असून बिल्डर्स असोसिएशनच्या फलटण शाखेच्यावतीने शहरातील अधिकारगृहासमोर हे एकदिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, याबाबतचे निवेदन बिल्डर्स असोसिएशन, फलटणच्या पदाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी दिले आहे.


Back to top button
Don`t copy text!