दैनिक स्थैर्य । दि. १६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये असणाऱ्या शिखर – शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाचे पुरातन व शिवकालीन मंदिर आहे. सदर ठिकाणी राज्यातून मोठ्या प्रमाणात भक्त व पर्यटक येत असतात. शिखर – शिंगणापूर येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या मालकीची जागा आहे. याठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधांच्यासह पर्यटन निवास बांधण्यासाठी मान्यता देण्यात यावी, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांना दिलेले आहेत.
मौजे शिखर – शिंगणापूर याठिकाणी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या मालकीची जागा आहे. याठिकाणी राज्यातील येणाऱ्या भक्त व पर्यटकांच्यासाठी सदर जागेवर अत्याधुनिक असे पर्यटन निवास बांधण्यात यावे, असेही निर्देश विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांना दिलेले आहेत.