दैनिक स्थैर्य । दि. १८ जानेवारी २०२३ । मुंबई । सागरी प्रांतातील आपल्या बांधवांची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धजन पंचायत समितीची निर्मिती केली, सदर समिती सध्या ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे, पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती आणि व्यवस्थापन मंडळाची निवडणूक ही शासनाच्या नियमाप्रमाणे दर पाच वर्षांनी लोकशाही पध्दतीने बेलार्ड पेपरच्या माध्यमातून होते तर संलग्न शाखांचीही निवडणूक त्याचप्रमाणे होते.
सदर समितीच्या तब्बल ८६४ शाखा मुंबई शहरात असून ४५० ते ५०० शाखा ग्रामीण भागात आहेत, या शाखांची अंतर्गत शाखांत तीन वर्षानंतर मुंबई व ग्रामीण भाग अश्या दोन टप्यात दफ्तर तपासणी काम करण्यात येते, सदर तपासणी अंतर्गत शाखा सभासदांची रजिस्टर नोंदणी, नवीन सभासद नोंदणी, मिनिट बुक, पावती पुस्तक, वार्षिक अहवाल नोंदणी अश्या स्वरूपात विभागवार तपासणी केली जाते.
यावर्षीही मा. सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने व सरचिटणीस राजेश घाडगे व कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कमिटीच्या वतीने दफ्तर तपासणी कामाला सुरुवात झाली असून दर दिवसाला पाच विभाग व प्रत्येक विभागात कमीतकमी २० शाखा असतात त्या सर्व शाखांची तपासणी करण्यात येते, नुकतीच सदर तपासणी कामाला सरचिटणीस राजेश घाडगे आणि कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी भेट दिली तेव्हा बऱ्याच शाखांचा लेखा-जोखा व त्यांच्या सुयोग्य नोंदण्या त्याना आढळून आल्या त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले, तसेच बौद्धजन पंचायत समितीची सात माळ्याची इमारत सर्व धम्म बांधवांच्या मदतीने स्वबळावर डौलाने उभी राहत असून, सहाव्या माळ्याचे काम पूर्ण झाले असून सातवा माळ्याचे काम जोमाने सुरू आहे तरी सर्वच शाखांच्या सभासदांनी आपली थकीत वर्गणी लवकरात लवकर जमा करावी असे आव्हान त्यानी सर्व शाखांना केले आहे, समितीचे माणगाव, नवी मुंबई, रत्नागिरी इथे ही काही जागा असून त्याठिकाणी ही बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम राबविण्याचा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा मानस आहे अशी माहिती सरचिटणीस राजेश घाडगे व कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी दिली व दफ्तर तपासणी काम सुयोग्य पद्धतीने सुरू असल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले असे प्रतिपादन जनसंपर्क व प्रसिद्धी प्रमुख रमेश जाधव यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात केले आहे.