बुध्दीस्ट स्टार्टअप समिटचे १३ एप्रिलला आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२४ | पुणे |
पुणे येथील स्वान फाऊंडेशन आणि बुद्धिस्ट नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता भाऊ इन्स्टिटयुट सी.ओ.पी., पुणे या ठिकाणी राज्याचे महिला आणि बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्टार्टअप आणि नवउद्योजकांना सक्षम बनविण्यासाठी या समिटचा उपयोग होणार आहे, अशी माहिती स्वान फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे आणि बुद्धिस्ट नेटवर्कचे भूषण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अश्विनी कांबळे, सिध्दार्थ अहिवळे (फलटण), साकेत डोंगरे, राहुल डोंगरे उपस्थित होते.

शशिकांत कांबळे पुढे म्हणाले, ज्या काळात जातीयतेचे सोंग माजले होते, त्या काळात एखाद्या अस्पृश युवकाने आपला व्यवसाय करावा, अशी संभावानाच नव्हती. त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्या युवकाने स्टार्टअप सुरू करण्याचे धाडस दाखविले ते वर्ष १९१७ होते आणि त्या युवकाचे नाव होते डॉ. भिमराव रामजी आंबेडकर. पुढील दशकात लोक त्यांना प्रेमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. त्या युवकाच्या धाडसी प्रयत्नाला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या विविध अंगापैकी ‘उद्योजकता’ हा सुध्दा एक अंग होता. हे औचित्य साधून स्वान फाऊंडेशन आणि बुद्धिस्ट नेटवर्क महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप समिटचे अयोजन करणार आहे.

यावेळी बोलताना भूषण गायकवाड म्हणाले, या समिटमध्ये सरकारी योजना आणि कार्यक्रम, नेटवर्क इव्हेंटस, बिझनेस मॉडलिंग, व्हेंचर डेव्हलपमेन्ट, कल्पनेपासून अंमलबजावणीपर्यंतची मदत याविषयी या समिटमध्ये चर्चा होणार आहे. यापूर्वी बुद्धिस्ट नेटवर्कच्या वतीने नागपूरमध्येही समिटचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.

नाव नोंदणीसाठी 97623 52469, https://rzp.io/l/BYV3kGl येथे संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!