बौद्धजन पंचायत समिती आयोजित बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । रत्नागिरी । बौद्ध धम्माच्या जडणघडणीत, प्रचार, प्रसार तसेच बौद्धांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचे संपादन करण्यात बौद्धचार्यांचे योगदान नेहमीच अग्रगण्य राहिले आहे, तथागत गौतम बुद्ध, बुद्धघोष, नागार्जुन आदी विद्वान बौद्धचार्यांची विचारधारा पुढे नेण्यासाठी बौध्दजन पंचायत समिती नेहमीच कार्यरत असते तीच धुरा पुढे नेत बौद्धजन पंचायत समिती तालुका रत्नागिरी व संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी कार्यालय, रत्नागिरी यांच्या भव्य सभागृहात आयोजित केलेल्या निवासी बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ मुंबई बौद्धजन पंचायत समितीचे अतिरिक्त सरचिटणीस रविंद्र रा. पवार, मुंबई संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश भा. पवार, सचिव मनोहर मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर प्रकाश रा. पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सदर प्रसंगी रविंद्र रा. पवार, मंगेश भा. पवार, सचिव मनोहरजी मोरे, तालुका अध्यक्ष आयु. प्रकाश रा. पवार, सेक्रेटरी सुहास कांबळे, उपाध्यक्ष विजय आयरे, संस्कार समितीचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष संजय आयरे, सचिव रविकांत पवार, तालुका माजी अध्यक्ष तू. गो. सावंत, शिक्षण समितीचे कदम गुरुजी, सचिव काशिनाथ तांबे, सांस्कृतिक कला-क्रीडा समितीचे कृष्णाजी जाधव, विलासराव कांबळे आदी मान्यवर, गाव शाखेचे सन्मानीय पदाधिकारी तसेच ६० बौद्धाचार्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

संपूर्ण तीन दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत पवार यांनी केले. शिबिरार्थी प्रशिक्षणार्थींना मुंबई मध्यवर्ती कार्यकरणीचे अति. सरचिटणीस रविंद्र पवार, संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार, सचिव मनोहर मोरे, यांनी बौद्धजन पंचायत समितीची स्थापना, संस्थापक, संस्थेची कार्यकारणी, नियमावली, उपक्रम, ध्येय-धोरणे, तसेच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ , डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मक्रांती, सम्राट अशोक, संत कबीर, फुले यांच्या मानवतावादी क्रांतीचे प्रवचनं दिली.

रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अष्टपैलू व कर्तबगार अध्यक्ष. प्रकाश रा. पवार यांनी गेली १०-१२ वर्षात तालुका अध्यक्ष म्हणून संघटनेच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, कार्यालयीन कामकाजास व जमिनीबाबत केलेली कार्यवाही अतिशय जिद्दीने व प्रामाणिक हेतूने केली असून त्यांच्या या उचित कार्याचा विशेष गौरव मुंबई मध्य. समितीचे कार्यकरणीनी जाहीरपणे केला.
ऐन दिवाळीच्या सुट्टीत समितीचे पदाधिकारी, मार्गदर्शक, संस्थानिक संस्था, स्थानिक शाखेचे, स्थानिक शाखांचे पदाधिकारी, संस्कार समितीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेऊन हे शिबिर यशस्वीपणे पार पाडले, यामध्ये रविकांत पवार व सुहास कांबळे यांनी खूप मेहनत घेतली. प्रमुख अतिथी मनोहर मोरे मार्गदर्शन करताना म्हणाले की “संस्थेची गुणवत्तेची पत ही सभासदांच्या संख्येवर नव्हे तर कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणावर, एकनिष्ठतेवर आणि शिस्तबद्ध नियोजनावर असते. तशाच प्रकारे आयु. प्रकाश रा. पवार यांची टीम तशीच उंच भरारी घेवो” अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.

आगामी काळात १० दिवसीय श्रामणेर शिबिरही रत्नागिरीत घेऊ अशा प्रकारचा मनोदय संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश भा. पवार यांनी व्यक्त केला, तर अति. सरचिटणीस रवींद्र रा. पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे जमिनीवर पाय ठेवून प्रामाणिकपणे काम चालत असल्यानेच रत्नागिरीचे आदर्शवत काम असल्याची चर्चा मुंबई कौन्सिलच्या सभेत होते, हा रत्नागिरीचा गौरव असल्याचे नमूद केले. अध्यक्ष आयु. प्रकाश पवार यांनी अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली व सहभागी सर्वांचे, सहकार्याचे कौतुक केले. शेवटी तालुका सचिव सुहास कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!