
स्थैर्य, फलटण, दि. ७ ऑक्टोबर : आगामी फलटण नगरपरिषदेची निवडणूक बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर आणि पूर्ण ताकदीने लढणार आहे, अशी घोषणा बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांनी केली. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सातारा येथे जिल्ह्याची संघटन समीक्षा बैठक पार पडल्यानंतर ॲड. डोंगरे यांनी फलटणला सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा प्रभारी उदय काकडे आणि विधानसभा अध्यक्ष प्रेम मोरे यांनी ‘जातीय व्यवस्थेचे निर्मुलन’ हे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना ॲड. डोंगरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे निर्देश दिले. यावेळी सुहास काकडे, राजेंद्र काकडे, ॲड. मनिष काकडे, प्रवीण विटकर, सचिन ठणके-पाटील, दिनेश कांबळे, प्रशांत सोनवणे, संदीप सोनवणे आणि अतुल मोरे उपस्थित होते.