छत्रपती शाहू महाराजांच्या स्वप्न पुर्ततेसाठी बसपा कटिबद्ध – अँड.संदीप ताजने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । मुंबई । समतामुलक राज्य प्रस्थापित करण्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी बहुजन समाज पार्टी कटिबद्ध आहे.पक्षाचे संस्थापक मान्यवर कांशीराम आणि राष्ट्रीय अध्यक्षा बहन सुश्री मायावती जी यांनी जेवढा छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान केला तेवढा कुठल्याच राजकीय पक्षाने केला नाही,असे प्रतीपादन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी केले. मुंबई महापौर बनाओअभियानांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू जी महाराज स्मृती शताब्दी वर्षछत्रपती शाहू जी महाराज जयंती महोत्सव समारोहसोहळ्यानिमित्त रंग शारदा सभागृहात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यातून ते बोलत होते.कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व प्रदेश प्रभारी मा.अशोक सिद्धार्थ साहेब, मा.प्रदेश प्रभारी मा.नितीन सिंह साहेब,मा.प्रमोद रैना साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.
१९१९ मध्ये छत्रपती शाहु महाराजांना उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये आयोजित एका समारंभातून राजर्षीही उपाधी देण्यात आली होती.त्यामुळे राज्यात सत्तेवर येताच मा.बहन मायावती जी यांनी कानपूर जिल्ह्याला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव दिले.त्यांच्या नावाने विद्यापीठे, स्मारके उभारली.रमामाई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची नावे जिल्ह्यांना दिली. स्मारके उभारली. हजारो कोटी रूपये खर्च केले.अशात महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी ज्या महाराष्ट्रात महाराजांचे संस्थान होते त्या कोल्हापूरचे नाव बदलून शाहूमहाराजनगरकरावे, असे आवाहन यानिमित्ताने अँड.ताजने यांनी केले. यावेळी उपस्थित फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायांनी समाजकारणासाठी राजकारणाचासंकल्प करीत सत्ताधारी होण्याचा निर्धार केला.

अस्थिर राजकीय स्थितीत बसपाच पर्याय-डॉ.अशोक सिद्धार्थ 
राज्यात छत्रपती शाहूजी महाराजांच्या उदारमतवादी विचारांवर चालणारे सरकार स्थापित करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष डॉ.अशोक सिद्धार्थ साहेबांनी उपस्थित कॅडरला संबोधित करतांना केले. राज्यातील अस्थिर राजकीय स्थितीमुळे हिरमोड झालेल्या सर्वसामान्य मतदारांना बसपाच एकमेव सशक्त पर्याय आहेअसा विश्वास यावेळी त्यांनी दिला. मुंबईत बसपाचा बराच मोठा जनाधार आहे. याच जनाधाराच्या आधारे येत्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत पार्टी किंगमेकरच्या भूमिकेत असेल. आतापासूनच वॉर्ड आणि बूथनिहाय रचना कार्यान्वित करण्याचे निर्देश कार्यक्रमातून डॉ.सिद्धार्थ यांनी कॅडरला दिले.

कार्यक्रमात प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा.प्रा प्रशांत इंगळे साहेब,मा.हुलगेश भाई चलवादी, मा.ॲड.सुनील डोंगरे साहेब,मा.मनीषभाऊ कावळे, प्रदेश महासचिव मा.रामसुमेसर जैस्वार, मा.सुदीप गायकवाड, दिगंबर राव ढोले , प्रदेश सचिव मा.नागोराव जयकर, मा.राजपाल गावंडे,मा.अविनाश वानखडे , मा.नागसेन माला,मा.सुदाम  गंगावणे ,मा.अप्पा साहेब लोकरे, मा.मनोज हळदे,प्रदेश सदस्य मा.अप्पाराव थोटे मुंबई प्रभारी मा.सुरेश महाडिक, मा.श्यामलाल जैस्वार, जिल्हा अध्यक्ष मा.प्रवीण धोत्रे, मा. संतोष भालेराव, मुंबई उपाध्यक्ष मा.शैलेश पवार, महासचिव मा.विनोद मोरे,सचिव मा.महेंद्र कनोजिया प्रामुख्याने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!