बीएसएनएलची रिचार्ज सुविधा उपलब्ध


स्थैर्य, सातारा, दि. 18 : भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी मल्टिपल रिचार्ज सुविधा सुरु केली आहे. या सुविधेनुसार बीएसएनएलचे प्रीपेड ग्राहक आपला सध्याचा प्लॅन संपण्याआधी आगाऊ रिचार्ज करु शकणार आहेत. ग्राहकांचा सध्या चालू असणारा हा रिचार्ज 97 रुपयांपासून 1999 पर्यंतच्या प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. ग्राहकांना आगाऊ रिचार्जची वैधताही सध्या चालू असणारी वैधता संपल्यानंतर चालू होणार आहे.

तसेच लँडलाईन व इंटरनेट सेवेचे 12 महिन्यांचे भाडे एकदम भरल्यानंतर एक महिना मोफत सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती जनरल  मॅनेजर टेलिकॉम, बीएसएनएल यांनी दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!