ब्रुसेल्स : फराह 11 महिन्यानंतर ट्रॅकवर धावला; नोंदवला सर्वाधिक अंतर पुर्णचा विक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.६: चार वेळेचा ऑलिम्पिक चॅम्पियन ब्रिटनचा मो. फराहने एका तासाच्या शर्यतीत सर्वाधिक अंतर पूर्ण करण्याचा विश्व विक्रम आपल्या नावे केला. त्याने डायमंड लीगमध्ये ही कामगिरी केली. २००७ मध्ये हेले गेब्रेलसेसीने एक तासात २१ हजार २८५ मीटर अंतर गाठले. फराहने २१ हजार ३३० मीटरचा विक्रम आपल्या नावे केला. रिओ ऑलिम्पिकनंतर फराहने रोड रनिंग सुरू केली होती. मात्र, टोकिओ आॅलिम्पिकमध्ये १० हजार मीटर शर्यतीत सहभागी होण्यासाठी पुन्हा ट्रॅकवर परतला. तो ऑक्टोबरनंतर पहिल्यांदा स्पर्धेत सहभागी झाला आहे. 

२१ हजार ३२२ मीटरसह बेल्जियमचा अब्दी बशीर दुसऱ्या स्थानी राहिला. बशीरने काही वेळ आघाडी घेतली होती, अखेर फराह विजेता ठरला. स्पर्धेनंतर फराहने म्हटले, “विश्व विक्रम मोडणे सोपे नाही. हे खूप कठीण आहे.’ कोरोना व्हायरसदरम्यान चाहत्या विना लीगचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमध्ये स्पर्धेत हॉलंडच्या सेफॅन हसनने एका तासात सर्वाधिक अंतर पूर्ण करण्याचा विक्रम केला. तिने १८ हजार ९३० मीटरसह डायर ट्यूनचा २००८ मधील १८ हजार ५१७ मीटरचा विक्रम मोडला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!