युरोपीयन महासंघातून ब्रिटनची ‘एक्झिट’


स्थैर्य, लंडन, दि.२५: युरोपीयन महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे. ‘द डील इज डन’ असे ट्विट त्यांनी केले आहे. मागील चार वर्षांपासून युरोपीयन महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होती. ती आता पूर्णत्वाला गेली आहे. युरोपीयन संघाबरोबरचे ब्रिटनचे मुक्त व्यापार करार यामुळे संपुष्टात येणार आहेत.

युरोपीयन महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया किचकट होती. विविध करार आणि कायदेशीर बाबींचा गुंता सोडविण्यासाठी चार वर्ष गेली. युरोपीयन देशांनी मिळून या युनियनची स्थापना केली आहे. यात २७ देशांचा समावेश असून सदस्य देशांना व्यापारात सवलती मिळतात. तसेच अणू विज्ञानातही सदस्य देशांचा सहभाग आहे. २०१६ साली ब्रेक्झिटसाठी सार्वमत घेण्यात आले होते. त्यात ५२ टक्के लोकांनी युरोपीयन महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला होता, तर ४८ टक्के लोकांनी विरोधात मतदान केले होते.

डिसेंबर २०१९ मध्ये ब्रिटनच्या संसदेने महासंघातून बाहेर पडण्याच्या कराराला मंजूरी दिली होती. त्यानंतर या प्रक्रियेला वेग आला. मागील चार वर्षांपासून ब्रिटनचे राजकारण या मुद्द्याभोवती फिरत राहिले. त्यावर आता अंतिम तोडगा दृष्टीक्षेपात आला आहे. ब्रेक्झिटच्या निमित्ताने व्यापारविषयक अनेक बाबी समोर आल्या होत्या. ब्रिटनच्या युरोपीयन क्षेत्रातील मासेमारी हक्कावरून बराच मोठा वाद झाला. मात्र, त्यावरही तोडगा निघाला आहे. अद्यापही काही मुद्दे वादातीत आहेत. मुक्त व्यापार आणि खुली व्यापारी स्पर्धा यातील तरतुदींवर युरोपीयन युनियन आणि ब्रिटनमध्ये दिर्घकाळ वाटाघाटी झाल्या. ब्रिटनचे युरोपीयन महासंघाबरोबरचे व्यापारी संबंध ३१ डिसेंबर २०२० ला संपुष्टात येत आहेत.


Back to top button
Don`t copy text!