मुधोजी हायस्कूल, फलटणचे इयत्ता १० वी परीक्षेत उज्वल यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित येथील मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण मधून  इयत्ता १० वी परीक्षेस बसलेल्या ७१८ विद्यार्थ्यांपैकी ७०८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल ९८.६० % लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ३२४ विद्यार्थी विशेष प्र प्राविण्यात, २३१ प्रथम श्रेणीत, १३६ द्वितीय श्रेणीत आणि १७ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत. विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. 

प्रशालेत कु. प्रज्ञा लक्ष्मीकांत तागडे  ९९.४०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम, कु. सई योगेश फौजदार  ९८.६०% गुण मिळवून व्दितीय आणि कु. सानिका राजाराम तरटे ९७.२०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेतील कु. सानिका तरटे, कु. सई फौजदार, तेजस दत्तात्रय गोफणे , कौस्तुभ राजेंद्र सासवडे , ओंकार विश्वनाथ तागडे या विद्यार्थ्यांनी  गणित विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत. कु. सई फौजदार, कु. वृषाली बाळकृष्ण मोरे यांनी संस्कृत विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे फलटण एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ चेअरमन तथा बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे, प्रशाळेचे प्राचार्य के. बी. खुरंगे, उपप्राचार्य एस. सी. अहिवळे व कनिष्ठ विद्यालय विभाग प्रमुख एम . के. फडतरे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!