श्री.ना.शंभुराज देसाई यांचा संसंक्षिप्त परिचय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । सातारा । श्री. ना. शंभुराज देसाई यांचा संसंक्षिप्त परिचय

जन्म : 17 नोव्हेंबर, 1966.

जन्म ठिकाण : मुंबई.

शिक्षण : एस.वाय.बी.कॉम.

ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी स्मितादेवी.

अपत्ये : एकूण 2 (एक मुलगा व एक मुलगी)

व्यवसाय : शेती.

पक्ष : शिवसेना.

मतदारसंघ : 261- पाटण, जिल्हा-सातारा.

इतर माहिती :
अध्यक्ष, लोकनेते बाळासाहेब देसाई फाऊंडेशन, दौलतनगर;

मार्गदर्शक, बाळासाहेब देसाई शिक्षण समुह, दौलतनगर;

प्रमुख विश्वस्त, दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्था;

सल्लागार, मोरणा शिक्षण संस्था मर्या., दौलतनगर; मरळी, तालुका-पाटण या संस्थेतर्फे पॉलिटेनिक कॉलेज, ज्युनिअर व सिनिअर कॉलेज, इंग्लिश मेडिअम स्कूल सुरु केले;

आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन; वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन; ग्रामीण डोंगराळ भागात वैद्यकीय सेवा कार्य;

वयाच्या १९ व्या वर्षी सन १९८६ पासून संचालक व १९८६-९६ चेअरमन, १९९६-२०१४ मार्गदर्शक-संचालक, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. दौलतनगर, मरळी, तालुका-पाटण, जिल्हा-सातारा;

सहकार क्षेत्रात १९ व्या वर्षी अशिया खंडातील सर्वात कमी वयाचे चेअरमन म्हणून निवड;

२००० संस्थापक, शिवदौलत सहकारी बँक, मल्हारपेठ; सदस्य, नॅशनल फेडरेशन ऑफ शुगर फॅक्टरी, नवी दिल्ली;

२००२-२००४ केंद्रीय प्रतिनिधी, बँक ऑफ महाराष्ट्र; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ;

१९९७-९९ सदस्य, महाराष्ट्र राज्य सहकार परिषद, मुंबई;

१९९७ पासून पाटण तालुक्यात व सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे संघटनात्मक कार्य;

१९९२-९७ सदस्य, पंचायत समिती, पाटण;

१९९२-२००२ सदस्य, जिल्हा परिषद, सातारा;

२००४-२००९, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्ष प्रतोद; विधिमंडळ लोकलेखा समितीचे सदस्य; विशाखापट्टणम येथील १७ व्या अखिल भारतीय प्रतोद परिषदेत प्रतिनिधीत्व केले; सदस्य, ग्रंथालय समिती, राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन २००७-२००८ चा “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले;

ऑक्टोबर, २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, जानेवारी, २०१९ ते जून २०२२ गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता आणि पणन खात्याचे राज्यमंत्री.

दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

(संदर्भ – 14 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)


Back to top button
Don`t copy text!