ब्रेनलीने ‘शिक्षक ऑफ द इयर २०२०’ च्या विजेत्यांची घोषणा केली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२०: विद्यार्थी आणि पालकांसाठीचा जगातील सर्वात मोठा लर्निंग मंच असलेल्या ब्रेनलीने ‘शिक्षक ऑफ द इयर २०२०’ च्या विजेत्यांची घोषणा केली. सर्वोत्तम शाळा शिक्षक/मुख्याध्यापक श्रेणीत हरियाणातील चाइल्ड्स मुस्कान-किड्स अकॅडमीच्या नूतन सैनी, सर्वोत्तम ऑनलाईन शिक्षक श्रेणीत ब्रेनली डॉटइन, उत्तर प्रदेशचे अमित गर्ग, आणि सर्वोत्तम ऑफलाइन शिक्षक श्रेणीत आदित्य बिर्ला इंटरमिडिएट कॉलेज, उत्तर प्रदेशचे डॉ. सुधीर कुमार नायक यांची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. सर्व विजेत्या शिक्षकांना ७५,००० रुपये अशी पुरस्काराची रक्कम प्रदान केली जाईल.

साथीच्या काळात अनेक आव्हाने असूनही, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अखंड प्रयत्न करून कर्त्यव्यापलिकडेही योगदान देणा-या शिक्षकांचा सन्मान करणे हा या पुरस्काराचा उद्देश होता. चाइल्ड्स मुस्कान-किड्स अकॅडमीला ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा वाढवण्याकरिता अतिरिक्त ३.७५ लाख रुपयांचे डोनेशन दिले जाईल. यासोबतच, ज्या शाळेतील शिक्षकांना पुरस्कार मिळाला, त्या शाळेला एअरलीकडून एअर क्वालिटी डिव्हाइस दिला जाईल. तसेच स्कॉलर्स रोझरी एसआर. सेक. चे हर्ष सैनी आणि दिल्ली पब्लिक स्कूलचे राज शुक्ला यांनाही सर्वोत्कृष्ट विद्यार्थी नामांकन असल्याबद्दल ३५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.

ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसानी म्हणाले, “ शिक्षक ऑफ द इयर’ ला उदंड प्रतिसाद मिळाला. यात विशेष अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे आमचे सर्व विजेते टीअर २ आणि टीअर ३ शहरांतील आहेत. यावरून आमचे शिक्षक किती सक्रियतेने विद्यार्थ्यांना मदत करत आहेत, हे दिसून येते. लहान भागातील आव्हाने आणि संसाधनांच्या कमतरतेवर मात करून त्यांचे हे कार्य सुरू आहे. त्यामुळे या गावांतून विविध क्षेत्रांतून बुद्धिवंत प्रतिभा निश्चितच उदयास येईल, याची आम्हाला खात्री आहे.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!