मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उद्या स्तन कर्करोग निदान, उपचार जनजागृती रॅली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ मार्च २०२२ । मुंबई । वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्तन कर्करोग निदान व उपचार जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही जनजागृती रॅली सकाळी ८ वा. काळा घोडा ते सेंट जॉर्जेस रुग्णालयापर्यंत असणार आहे.

वैद्यकीय शिक्षण विभाग आणि नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त स्तन कर्करोग निदान व उपचार याबाबत ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!