दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२२ । सातारा । फलटण परिसरामध्ये मिलिटरी मध्ये भरती करतो असे सांगून रॅकेट चालवणाऱ्या एका अकॅडमीवर मिलिटरी इंटेलिजन्सचा छापा पडला आहे. यामध्ये आज सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असेल व यामधील काही जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे, अशी माहिती समोर येत आहे.
फलटण परिसरामध्ये आर्मीमध्ये नोकरीला लावतो असे सांगून अनेक जणांची फसवणूक झालेली आहे. यामध्ये कागदपत्रे व नियुक्तीपत्रे सुद्धा खोटी देण्यात आलेली आहेत. याबाबतची माहिती आर्मी इंटेलिजन्सला मिळाल्यानंतर त्यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे छापा मारलेला आहे. अशी प्राथमिक माहिती सद्यस्थितीत समोर येत आहे.