संशयीत गजाआड, पोक्सोअंतर्गत गुन्हा दााखल
स्थैर्य, सातारा, दि. 14 : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून घरातील मोबाईलचे सीमकार्ड चोरून नेणार्यास शाहूपुरी पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्याच्याकडून चोरीस गेलेले सीमकाड आणि आणखी एक चोरीचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबात माहिती अशी, दि. 27 जून रोजी पहाटे 03.30 वाजण्याच्या सुमारास संशयीत अनिल बाबासाहेब थोरात वय-33 रा.339 मंगळवार पेठ सातारा फिर्यादीच्या घरात बेकायदा प्रवेश केला. घरातील अल्पवयीन मुलीस मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पिडीता ओरडेल म्हणून संशयीताने तिचे तोंड दाबून कोणास सांगीतले तर मारण्याची धमकी दिली व पळून गेला. यावेळी जाताना त्याने मोबाईलचे सिमकार्डही घेऊन गेला.
याबाबत फिर्यादीने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचे नाव निष्पन्न करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे शाहुपुरी पोलीस ठाण्यातील सपोनि विशाल वायकर, सपोनि संदीप शितोळे, हवालदार अतिश घाडगे, सतीश बाबर, पोकॉ सुनिल भोसले, हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, ओकार यादव, स्वप्निल कुंभार, पंकज मोहिते, चालक नितीन शिंगटे यांनी कौशल्यपुर्ण गुन्ह्याचा तपास करून गुन्हा तांत्रिक बाबीवर गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हा उघडकीस आणत आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीस गेलेले सिमकार्ड हस्तगत केले आहे. तसेच अटक कालावधीत आरोपीकडे सखोल चौकशी केली असता आणखी एक 7 हजार रुपयांचा एमआय कंपनीचा मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला. त्यानंतर तो मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केला आहे. दरम्यान, संशयाीताला कोर्टात हजर केले असता दि.15 रोजीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.