स्थैर्य, सोलापूर दि.19 : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार सुभाष देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, आयुक्त बापू बांगर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
बैठकीच्या सुरवातीस दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती आणि त्यावर केलेल्या उपाययोजना यांची माहिती उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.
यावर कोरोना संसर्गाची साखळी तोडा विडी घरकुल परिसरात जास्त लक्ष द्यावे.
तेथील नागरिकांचे सर्व्हेक्षण करा. शहरातून येणाऱ्या लोकांवर विशेष लक्ष ठेवा, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या. आमदार देशमुख यांनी बांधकाम कामगारांचे नूतनीकरण करायला हवे, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेच्या नियमात बदल करायला हवे, असे सांगितले. यावर संबंधित विभागांना सूचना दिल्या जातील, असे श्री. भरणे यांनी सांगितले.
बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, तहसिलदार उज्ज्वला सोरटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, गटविकास अधिकारी राहुल देसाई आदी उपस्थित होते.