यंदाची असणारी दुष्काळी परिस्थिती, बदलतर हवामान, ऋतूचक्र, निसर्गाचा लहरीपणा, सार काही यावर्षी बघितलं…
खळाभर मावत नसणारी बाजरी आज खळ्यात दिसत नाही, बर्याच भागात दुबार पेरणी, पावसाने दिलेली हुलकावणी, त्यामुळं उभ्या पिकात गुर बांधावी लागली, किती सोसावं शेतकर्यानं, दुःख जणू त्याच्या पाचवीलाच पुजलेले आहे…
सकाळी एक फोन आला सर गाय विकायची आहे, गिर्हाईक बघा. खर्च परवडत नाही, विकत चारा परवडत नाही, काल रानात बाजरी काढताना समजलं शेतकर्यावर डोळ्यात खोटे अश्रू आणून बोलण सोप्पं, पण शेतकरी होणं, वेदना सहन करून उभं राहणं फार अवघड…
भाकरी मॉलमध्ये मिळत नसते, ती पीक बनून रानात उगवावी लागते. सागर मोरे माझा जीवलग मित्र कायम म्हणतो, एक दिवस जगात सगळ्यात महाग भाकरी असेल.
– नवनाथ कोलवडकर